लखनऊ| आगामी काळात म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Elections) रणधुमाळी रंगल्याच पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यातच कानपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कानपूर (Kanpur)
येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित सभेत बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
अत्तर व्यापाऱ्याकडे सापडलेल्या कोट्यावधींच्या घबाडावरून नरेंद्र मोदी यांनी टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षांचं हेच कर्तृत्व आणि वास्तव आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) बोचरी टीका केली आहे. बॉक्स भरून नोटा सापडल्यात तर मला वाटलं की, हे देखील आम्हीचं केलं आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कानपूरच्या जनतेला व्यवसाय आणि व्यापार यांची चांगली जाणीव असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
2017 पुर्वी भ्रष्टाचाराचं अत्तर त्यांनी संपुर्ण उत्तर प्रदेशात शिंपडलंय, हे सर्वांनीचं पाहिलं आहे, असं म्हणत त्यांनी समाजवादी पार्टीला लक्ष्य केलं. अत्तराच्या व्यावसायिकाकडे घबाड सापडल्यानंतर आता हे लोक मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
आता विरोधक श्रेय घेण्यासाठी पुढे येणार आहेत. हेचं त्यांच कर्तृत्व आणि वास्तव असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशची जनता सर्वकाही पाहत असून त्यांना सर्व काही जाणते, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
यापुर्वी उत्तरप्रदेश येथे सत्तेत असणाऱ्या सरकारांवर नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. त्यांना वाटत होतं की, सत्ता आली म्हणजे पाच वर्षांसाठी राज्याला लुटायची लॉटरी आहे. परंतु, सध्याचं डबल इंजिनचं सरकार जबाबदारीने आणि प्रामाणिकतेने काम करत आहे.
तसेच आयआयटी कानपूर (IIT Kanpur)येथील भाषणात पंतप्रधानांनी आज कानपूरकरिता दुहेरी आनंदाचा दिवस आहे. एकीकडे कानपूरला मेट्रोसारखी सुविधा मिळत आहे तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या जगातही तुमच्यासारख्या भेटवस्तू मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कानपूर आयआयटीने अशी ताकद दिली आहे की, तुम्हाला तुमची स्पप्ने पुर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 21 वे शतक हे पुर्णत: तंत्रज्ञानावर आधारीत आहे.
तंत्रज्ञान विविध क्षेत्रात आपला दबदबा वाढवणार आहे. आता तंत्रज्ञानाशिवाय आयुष्य अपुर्ण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेल मिळणार की बेल मिळणार? नितेश राणेंचे वकील म्हणतात…
भाजपचे आमदार फुटणार???, नाना पटोलेंचे सुचक संकेत
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे