“पुलवामासारखी घटना घडली नाही तर परिवर्तन नक्की होणार”

औरंगाबाद | मी पूर्ण मराठवाडा फिरलो आहे. तरूणांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनात बदलाची चाहूल आहे. पुलवामासारखी घटना घडली नाही तर परिवर्तन नक्की होणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गेल्या 2 ते 3 दिवस ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज औरंगाबादेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

लोकसभा निवडणुकीच्या आधीदेखील लोकांचा असंतोष खदखदत होता. मात्र सीमेवर पुलवामा घडलं आणि त्याचाच लाभ निवडणुकांमध्ये भाजपला झाला, असं पवार म्हणाले.

पुलमावाबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनाच शंका होती की तो घडला की घडवला. पण तो देशाचा विषय होता म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना त्यावर बोलू नका असं सांगितलं होतं, असं पवार म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण मराठवाडा फिरल्यानंतर मला लोकांच्या मनात सरकारल बद्दल राग दिसतोय, यंदा बदल नक्की होणार, असं पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-