मुंबई | गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यात नवं सरकार स्थापन केलं.
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
सत्ता येते सत्ता जाते. सत्ता परत येते मात्र, ज्या पद्धतीने तुमच्या सर्वांचं प्रेम जर क्वचित कोणाला लाभलं असेल तर मला लाभलं आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
ज्या विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून उतरवून स्वत: जो काही मुख्यमंत्री होण्याचा अट्टहास केला आहे तो जनतेला आवडेल न आवडेल हे जनता ठरवेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
अडीच वर्षापूर्वीच मी अमित शहांना अडीच वर्षाचा फॉर्मुला सांगितला होता. पण अमित शहांनी दगा दिला. मग जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आरे कारशेड प्रकल्पावरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. माझा राग मुंबईवर काढू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं पण…’, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
‘हात जोडून विनंती आहे माझ्यावरचा राग…’, शिंदे सरकारला उद्धव ठाकरेंचं जाहीर आवाहन
फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…
“बिचारे देवेंद्र फडणवीस…, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला”