मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली होती. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितल्यानं त्यामुळे हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाला गैरहजर राहिल्यानं विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंकडे राज्याचा चार्ज द्यावा, असा टोला लगावला होता.
त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे राज्याचा चार्ज द्यायला काही हरकत नाही, असा टोला देखील लगावला होता.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली होती. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे संभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचं प्रमुखपद दिलं तर काही हरकत नसेल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचं नातं आहे, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का ?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…
पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!
आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर