Top news आरोग्य देश

RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

corona test e1641471934244
Photo Courtesy- Pixabay

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) होणार का? याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिंतेत वाढ झाली आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता क्वारंटाईन कालावधीही कमी करण्यात आला आहे. 14 दिवसांवरून 7 दिवसांचा कालावधी करण्यात आला आहे.

आरटीपीसीआर (RTPCR ) रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही कोरोनाची काही लक्षणं दिसत असल्याचं आढळून आलं आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही लक्षणं दिसत असतील तर याविषयी डाॅक्टरांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे.

संसर्ग संपल्यानंतरही ही लक्षणे दिसणे म्हणजे रुग्णाला आणखी एखादी किंवा काही जास्त समस्या आहेत. रुग्णाला घसा, पोट किंवा छातीत जंतुसंसर्ग असू शकतो किंवा लघवी संसर्गामुळेही ताप आणि इतर समस्या उद्भवलेल्या असू शकतात, असं गुरुग्रामच्या मॅक्स हॉस्पिटलचे सहयोगी संचालक डॉ. शैलेश सहाय यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगतिलं आहे.

कोरोना आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे आता बूस्टर डोसलाही परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचा कहर संपत नाही तोच ओमिक्राॅननं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीच धास्ती पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढत चालली आहे.

ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटचा वाढता संसर्ग पाहता आणि वाढती रुग्णसंख्या पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”