उद्या पवार साहेबांनी सांगितलं राजीनामा दे… तर दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल- अमोल कोल्हे

इंदापूर |  उद्या पवार साहेबांनी सांगितलं राजीनामा दे तर दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल आणि पक्षाचं काम इमाने इतबारे करेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज इंदापुरात पोहचली आहे. त्या सभेला अमोल कोल्हे संबोधित करत होते.

इंदापुरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद आहेत. दोन्ही पक्षाला ही जागा आपल्याकडे हवी आहे. त्याचवरून आजच्या सभेत उपस्थितांमधून कुणीतरी आजच दत्ता मामांचं तिकीट फिक्स करा, असं ओरडलं. त्यावर मी फिक्स करणारा कोणी नाही. मी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे. उद्या पवार साहेबांनी सांगितलं राजीनामा दे तर दुसऱ्या क्षणाला खासदारकीचा राजीनामा देईल, असं कोल्हे म्हणाले.

खासदारकीचा मला मोह नाही. सत्तेचा मला मोह नाही. पदाचा मला मोह नाही. राष्ट्रवादीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करायला तयार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, दत्ता मामांचं तिकीट फिक्स की नाही मी सांगणार नाही मात्र एवढं नक्की सांगेल येणाऱ्या विधानसभेला भाजप शिवसेना पुन्हा नाही तर यंदा शिवस्वराज्य येणार, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-