“मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलतं करावं”

मुंबई |  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये आणखीएक वादाची ठिणगी पडली आहे.

विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षीय नेत्यांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली दिसत आहे. या मुद्यांवरुन विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून ज्या घटना बाहेर येत आहेत. त्या घटनांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्री बोलत नसतील, तर राज्यपालांनी त्यांना बोलत करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनीतरी या घटनासंदर्भात दोन प्रेस घेतल्या. मात्र त्यांनी पाठीशी घालण्याचं काम केलं. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची कोणतीच भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक बोलतात आणि इथं एक बोलतात असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

आज भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवात दाखल झाले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस, अशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडीने सर्व नैतिकता पायाखीली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्यापलीकडे काहीही नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांत ज्या घटना समोर येत आहेत. त्या अत्यंत चिंताजनक आहेत. जर कोणत्या अधिकाऱ्याने खरे सांगितलं तर तो भाजपचा एजंट ठरते आणि जर हफ्ता वसूली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट ठरतो का?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आज मध्यरात्रीपासून ‘या’ जिल्ह्यात 11 दिवसांचं…

थॉयरॉईडमुळं वजन वाढतंय, मग घ्या ‘ही’ काळजी

“काही झालं तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली…

जाणून घ्या! कांद्याच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी…