‘खोकला थांबतच नसेल तर…’; टास्क फोर्सने दिले गंभीर संकेत

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसत आहे. अनेक नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत आहेत. यात प्रामुख्याने सर्दी किंवा खोकला असल्याचं दिसत आहे.

सध्या सर्वत्र खोकला, सर्दी, तापीचे रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे सामान्य लक्षणं असली तरी आरोग्यावर आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

खोकला ओमिक्रॉनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ब्रोंकायटिस झाला तर दोन ते तीन महिने साधारण खोकला राहतो. त्यामुळे वेळीच उपचार घेण्याची गरज असल्याचं टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर म्हणाले आहेत.

ओमिक्राॅनरूग्णांमध्ये ताप राहणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, रात्रीच्या वेळी घाम येणं ही सर्व लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर खोकला सात्त्याने येत असेल तर ते देखील ओमिकाॅनचं लक्षण आहे.

मात्र जर खोकला दोन-तीन आठवडे जात नसेल तर एक्स रे करुन घ्यावा, असा सल्ला देखील डाॅ. नागवेकर म्हणाले आहेत.

पोस्ट कोविड खोकला हा सध्या प्रामुख्यानं ब्रोंकायटिसमुळे येत असल्याचं देखील संशोधनातून समोर आलं होतं. त्यावर एक्स रे हाच एक उपाय आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, चांगला व्यायाम करा, श्वसनाचा व्यायाम करा आणि चांगला पोषक आहार घ्या, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर

काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत 

अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले… 

मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!  

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर!