‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | राणा दाम्पत्यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे राज्यातील वातावरण कमालीचे तापलं आहे.

राज्यात सध्या किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्यांमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी वक्तव्य केलं आहे. गेल्या दोन वर्षात केंद्रीय गृहसचिवांना भाजपचं शिष्टमंडळ 7 वेळा भेटून आलं. आता कुणालातरी ओठाखाली रक्त आलं आहे, त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

यांना काही ना काम ना धंदा, अशा खोचक शब्दांत राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून मागील 3 महिन्यात 17 बलात्कार झाले. तिथे लावता का राष्ट्रपती राजवट?, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून मागील 3 महिन्यात 17 बलात्कार झाले. तिथे लावता का राष्ट्रपती राजवट?, असं संजय राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशातील घटनांबाबत गृहमंत्र्यांना कोणी माहिती देत असले तर त्यांनी माहिती घेतली असेल. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा

दोन-चार लोकं जातात. दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. महाराष्ट्राच्या बदनामीचे हे षडयंत्र आहे, असा जोरदार संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

या हल्ल्यानंतर भाजप पेटून उठलं आहे आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘राष्ट्रपती राजवट लागू करा…लै मजा येईल…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

  येत्या पाच दिवसांत ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

  “भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे….”

  Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा काय आहेत दर

  मोठी बातमी ! भायखळा तुरुंगात रवानगी होताच नवनीत राणा यांची प्रकृती खालावली