“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार”

मुंबई | जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील गारखेडा इथे सकाळी अपघाताची घटना घडली. यामध्ये तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बोलताना शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एक इशारा दिला आहे.

येत्या दोन दिवसात एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: बस चालवत आपल्या मतदारसंघातील एसटी सेवा सुरू करतो, असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्ह आहे.टलं यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना रिक्षाने किंवा इतर वाहनाने प्रवास करावा लागतोय. अशात रिक्षाने प्रवास करत असताना अधिकचे प्रवासी बसल्याने हा अपघात झाला. या अपघाताला संप करणारे कर्मचारी जबाबदार असल्याचं चंद्रकातं पाटील यांनी म्हटलं आहे.

एसटी सेवा बंद असल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: बस चालवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच माझे कार्यकर्ते देखील आपल्या मतदारसंघात बससेवा सुरू करतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

एसटी बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांचे होणारे हाल बघवत नाहीयेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण संप किती दिवस लांबवायचा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत, त्या त्यांनी स्विकाराव्यात आणि तोबडतोब एसटीची सेवा सुरू करावी, अशी विनंती पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, संपातून कर्मचारी संघटनेचे अजय गुजर यांनी माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतरही हा संप सुरू ठेवणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संपातून दोघं बाहेर पडल्याची घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” 

“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत” 

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का? 

‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर