“जर पगडी चालते तर हिजाब का नाही?”, अभिनेत्री सोनम कपूरचा सवाल

मुंबई | कर्नाटकच्या उडुपीमधील एका शाळेत मुलींनी हिजाब घातला म्हणून शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर देशभरात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे.

देशातील वातावरण आता हिजाबच्या मुद्द्यावरून पेटल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. तर सोशल मीडियावर देखील याचीच चर्चा होत आहे.

आता कर्नाटकातील हिजाब वाद हा दिवसेंदिवस वाढत असतानाच बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने हिजाबवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून हिजाबच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये एक शीख तरुण एका बाजूला पगडी घातलेला दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला एक महिला हिजाब घातलेली दिसतीये.

शीख तरुण पगडी घालू शकतात, मग मुस्लीम महिला हिजाब का नाही?, असा सवाल सोनमने विचारला आहे. सोनम कपूरने पगडीची तुलना हिजाबशी केल्याने आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय.

सोनम कपूरचे इन्स्टाग्रामवर खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 31 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आता चाहते देखील तिची पाठराखन करत असल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

अभिनेत्रीनं शेअर केला हनिमूनचा व्हिडीओ, पाहणाऱ्यांची उडाली झुंबड

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ