‘त्यांची सुपारी फुटली नसेल म्हणून आता…’; मनसेचा घणाघात

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याने राजकीय पटलातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दौरा रद्द केल्याचं म्हणत जोरदार टिका केली आहे. मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्या दौरा रद्द केल्याने मनसेला डिवचले होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी काही सहकार्य हवं असतं तर केल असंत, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता.

संजय राऊतांना आमदार राजू पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.  सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे हा दौरा रद्द झालेला नाही. पुढे ढकलण्यात आलेला आहे. आम्हाला यांची गरज नाहीये, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांना कदाचित दु:ख वाटत असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल, त्यांचं राजकारणचं हित साध्य झालेलं नसेल. पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल याचं दु:ख वाटत असेल, असं आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणामुळे हा दौरा स्थगित केलेला आहे. साहेब त्यांची भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत, असं राजू पाटील यांनी सांगितलं आहे. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या दौरा रद्द होण्यावरून स्पष्टिकरण दिलं आहे.

राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याने काही उलटसुलट चर्चा करण्याचे काही कारण नाही. येत्या 22 तारखेला पुण्यात सभा घेऊन ते बोलणार आहेत. तेव्हा अयोध्या दौरा तुर्तास का स्थगित कराव लागला याचे उत्तर देतील, असं  बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आपण 22 तारखेला सविस्तर बोलूच असं लिहिलं आहे. त्यामुळे 22 तारखेला तुम्ही आणि आम्ही उत्सुक आहोत, असं देखील बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पु्ण्यातील सभेचा मनसेकडून टिझर लाँच करण्यात आला आहे. या टिझरमध्ये राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्यात आलेली आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच येथे सकाळी 10 वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार

‘नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनियम सुरू’; राष्ट्रवादीचा मनसेला जोरदार टोला

मोठी बातमी ! राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर