खऱ्या अर्थाने कोणी काम करणारे मंत्री असेल तर ते म्हणजे नितीन गडकरी – शरद पवार

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विकासकामांमुळे सर्व स्तरातुन त्यांची स्तुती होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरींवर अनेकवेळा स्तुतीसुमनं उधळली आहेत.

शरद पवार चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं आहे. तर माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल आहे. हा प्रादेशिक असमतोल दुर करायला पाहिेजे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच याकडे राज्य चालवणाऱ्यांनी लक्ष द्यावे. पाच वर्ष विदर्भातील नेतृत्वाकडे राज्याची सत्ता होती. स्थानिक समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य होते, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

तसेच नितीन गडकरींच कौतुक करताना शरद पवार म्हणाले आहेत की, नितीन गडकरी हे समस्या सोडविणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या ते जाणून घेतात. तसेच तातडीने सोडवतात.

समस्या घेऊन येणारा कोणत्या पक्षाचा आहे याचा ते कधीही विचार करीत नाहीत. पक्ष विसरून ते काम करतात, अशा शब्दात शरद पवारांनी नितिन गडकरींची स्तुती केली आहे.

नितीन गडकरी जेंटलमन नेते आहेत. खऱ्या कोणी काम करणारा मंत्री असेल तर ते म्हणजे नितीन गडकरी, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

यावेळी शरद पवारांनी राज्य सरकारला अमरावती हिंसाचार प्रकरणावरून काही सल्ले दिले आहेत. राज्यातील काही शहरात हिंसाचार झाला तो हिंसाचार पोलिसांनी तातडीने नियंत्रणात आणला. परंतु, या हिंसाचारामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदत नुकसानीबाबत नव्या धोरणांची गरज आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यसरकारने यावर विचार करावा, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच शरद पवार यांनी भाजपने अमरावती येथे पुकारलेल्या बंदवरून देखील टीका केली आहे. भाजपने अमरावतीत त्रिपुरा घटनेचा निषेध म्हणून रॅली काढून वातावरण खराब केले, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

त्रिपुरा घटनेचा निषेध अमरावती,नांदेड, मालेगाव येथे नको व्हायला होता. दंगलीत कोणाचा हात होता याबाबत पाठवलेल्या अहवालात काही माहिती नाही. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी काही लोकांनी याचा फायदा घेतला. याबाबत खोलात जाण्याची गरज आहे, असं शरद पवारांनी  म्हटलं  आहे.

दरम्यान, त्रिपुरात हिंसाचार घडला म्हणून महाराष्ट्रात असं घडण योग्य नाही. तसेच महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं  हे लोकांनी ठरवावं, असंही शरद पवार म्हणाले आहे त.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला धक्क्यावर धक्के! 4 माजी मंत्री आणि 3 माजी आमदारांनी ठोकला रामराम

अखेर परमबीर सिंह फरार घोषित; आता उरले फक्त 30 दिवस

‘पाकव्याप्त कश्मीरचा ताबा सोडा’; डॉ. काजल भट यांनी पाकिस्तानला खडसावलं

आयसीसीमध्ये चालणार ‘दादा’गिरी! सौरव गांगुलीच्या खांद्यावर आली ‘ही’ मोठी जबाबदारी

 “सांगे कीर्ती बापाची, तो एक मुर्ख”; नाना पटोलेंवर खोचक टीका

शरद पवार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस