मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. तर काहीही झालं तरी राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे, असा पुनरूच्चार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
शिंदे गटानं भाजपसोबत जावं, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून येत आहे. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
मला उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटतो. घरातील मोठा भाऊ कसा असावा तर उद्धव ठाकरेंसारखा असावा असं वाटतं, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राजकारणात यश अपयश, चढ-उतार येत असतात. उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचं दडपशाहीचं सरकार कधीच नव्हतं आणि कधीच नसेल. भाजपला बैठका घ्यायच्या असतील तर घेऊ देत, असं मत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
फडणवीस दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या आहेत.
मला माहिती नाही ते कुठे आहेत. मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही, असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा’, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान
‘आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न, पण कार्टुनमध्येही…’; निलेश राणेंचा टोला
‘आजचा शेवटचा दिवस असेल…’; बंडखोर आमदाराचा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना इशारा
“तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?”
“येत्या दोन तीन दिवसात भाजपचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”