Health: तुमच्याही शरीरात जाणवतात का ‘हे’ बदल???; वेळीच सावध व्हा नाहीतर…

मुंबई | सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या आरोग्याकडं (Health) लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. परिणामी त्यांना विविध आजार होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

दररोज जेवणात सातत्यानं बाहेरील खाद्यपदार्थांचा समावेश केल्यानं देखील आजार होतात. बाहेरील खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांचा समावेश असतो.

सध्या डाॅक्टरांना फुफ्फुसाचा कर्करोगाचे रूग्ण अधिक प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा प्रकार हळुहळू व्यक्तीला आपल्या कवेत घेत असतो.

फुफ्फुसाचा कर्करोग होण्यास फक्त धुम्रपान, तंबाखू, गुटखा, दारू याचं सेवन कारणीभूत नसून अनेक कारणांनी फुफ्फुसाचा कर्करोग होत असतो. परिणामी काळजी घेणं गरजेचं आहे.

कोरोना काळात खोकला येणं ही सामान्य बाब झाली आहे. पण खोकलल्यानं कोरोना नाही तर अनेक आजार देखील होत असतात. खोकताना रक्त येत असेल तर डाॅक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.

श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर हे फुफ्फुसाचा कर्करोगाचं एक लक्षण आहे. जास्त प्रमाणात श्वास कोंडत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणं गरजेचं आहे.

वजन घटवण्यासाठी व्यक्ती नेहमी अनेक प्रकार अवलंबतात. पण कोणताही उपाय न अवलंबता आणि डायटिंग न करता देखील वजन कमी होत असेल तर फुफ्फुसाचा कर्करोगाचं एक लक्षण असल्यानं कमी होत असलेल्या वजनाकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही.

दरम्यान, छाती, गुडघे, खांदे, पाठ शरीराच्या या भागात खूप दिवस सातत्यानं दुखत असेल तर फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका असण्याची शक्यता आहे. परिणामी डाॅक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Ukraine crisis: “तुमच्यावर 9/11 हल्ला झाला तसाच…”; अमेरिकन संसदेला संबोधित करताना झेलेंस्की भावूक

 “CD होती पण वेळ नव्हती, आता CD बाहेर काढणार”; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार

 Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा

Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज

फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…