दाढी मिशा तर कुणीही वाढवतं, दम असेल तर…. ‘या’ नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज

मुंबई | सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्याच पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेबरोबरच सेवा व उद्योग क्षेत्रांना चांगलाच बसला आहे. घसरता जीडीपी आणि वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “दम असेल तर जीडीपी रोजगार वाढवा, दाढी-मिशा तर कोणीही वाढवू शकतं” असं बोलत सातव यांनी मोदींना टोला लगावला आहे.

देशात कोरोना नियंत्रण करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. तब्बल दोन ते अडीच महिने देशभरात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. कोरोनाच्या काळात रोजगाराच्या संधी ही प्रचंड घटल्या आहेत.

दरम्यान, इंडिया रेटिंग्जनं जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वृद्धीवर असलेली भारतीय अर्थव्यवस्था ही वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये नकारात्मक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याबरोबरच मागील 41 वर्षातील हा नीचांक दर असेल असंही रेटिंग्जने म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक, सुशांतसिंग राजपुतच्या नावाने सुसाईट नोट लिहून ‘ती’ने केली आत्महत्त्या !

‘मी आता बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच माझे सरकार पाडा’

कोव्हीड योद्ध्यांवर पुन्हा जमावाकडून जीवघेणा हल्ला!

दहा दिवसांचं लॉकडाऊन संपलं, पुणेकरांसाठी पुढील नियम कोणते?

प्रियंका आणि दीपिकाही ‘या’ गुन्ह्यात असल्याची शक्यता; मुंबई पोलीस करणार चौकशी