नवी दिल्ली | दैनंदिन जिवनात आपल्या सहकाऱ्यासोबत अनेक कारणावरून भांडणं होणं हे आता स्वाभाविक झालं आहे. असं असलं तरी नात्यात दुरावा येण्यास काही खास कारणं असतात.
एखाद्या व्यक्तीसोबत सातत्यानं राहील्यावर आपोआप तो व्यक्ती खोट बोलतोय की खरं हे लवकर समजायला लागतं. महिला तर खूप लवकर या गोष्टी समजतात. पण पुरूष आणि महिला दोघेही आपल्या साथीदाराला धोका देऊ शकतात.
अशा काही खास गोष्टी असतात ज्यावरून आपण आपला जोडीदार खोट बोलतोय की खरं, तो आपल्याला फसवत तर नाही ना, हे जाणून घेऊ शकतो.
सोबत जेवायला गेल्यावर किंवा सोबत घरी जेवताना एखादा काॅल आल्यावर जोडीदार जर बाजूला जाऊन जेवत असेल तर काहीतरी काळभेरं असण्याची शक्यता असते.
सातत्यानं आपला साथीदार जर आपल्याला टाळत असेल त्याचा मोबाईल आपल्यापासून लपवत असेल तर नक्की समजून जायचं की तो आपल्याला फसवतोय.
अचानकपणे जर त्याला शरीराबद्दल आस्था वाटू लागली असेल. जोडीदार आपली फिगर चांगली करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला न सांगता तर कदाचित तो तुम्हाला फसवण्याची शक्यता जास्त आहे.
ऑफिसमध्ये कामाला असताना बिझनेस ट्रिपच्या आयडिया सातत्यानं तुम्हाला सांगून तो बाहेर जात असेल. सातत्यानं भांडण करण्यासाठी कारणं शोधत असेल तर तुमच्या नात्यात सर्वकाही ठिक नाही असं समजा.
घरातून सुट्टीच्या दिवशी सुद्धा एकट्यानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे आणि हे वारंवार घडणं असं दर्शवत की तुमच्या पार्टनरला कोणीतरी दुसरी व्यक्ती आवडायला लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“शिवसेना आता जनाब शिवसेना झालीये”; फडणवीसांची खोचक टोला
“पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”
कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”
“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”