“जर ते वक्तव्य मुस्लीम व्यक्तीनं असतं तर…”

नवी दिल्ली | देशाच्या स्वातंत्र्याला आता 75 वर्षे होत आहेत. पारतंत्र्यात असणाऱ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. अनेकांच्या घरावर कायमची तिलांजली अर्पण करून हे स्वातंत्र्य मिळालं आहे.

देशाच्या स्वातंत्र्याची जाण प्रत्येक भारतीयाला असणं गरजेचं आहे. पण चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयानं आपली प्रतिमा बनवणाऱ्या व्यक्तीकडून स्वातंत्र्य लढ्याचा अपमान व्हावा ही निंदनीय बाब आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कंगणा राणावतनं एका कार्यक्रमात देशाला 1947 साली भीक मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे.

देशासाठी झगडणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करत कंगणानं देशाला भीक मिळाली होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

कंगणावर कारवाईची मागणी आता देशभरातून जोर पकडत आहे. प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेते केआरके यांनी कंगणावर निशाणा साधताना कंगणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कंगणावर कारवाईची मागणी करताना केआरके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टॅग करत एक ट्विट केल आहे. जर कुणी एका मुस्लीम व्यक्तीनं देशातील स्वातंत्र्य सेनानींचा अपमान केला असता तर त्याला देशद्रोही समजले असते. आणि त्याला जेलमध्येही टाकले जाते, असं केआरके यांनी म्हटलं आहे.

एका मुस्लीम व्यक्तीनं असं केलं असतं, तर मग कंगनानं केलेल्या एका वक्तव्यामुळं तिला अटक का केली जात नाही?त्यावरुन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मी कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे.

केआरके यांनी हे ट्विट करत असताना मुंबई पोलीस, हिमाचल पोलीस, दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केलं आहे.

कंगणा रानौतच्या  स्वातंत्र्यसैनिकांबद्दलच्या वक्तव्यानंतर देशभरातून कंगणाला दिला गेलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी करण्यात येत आहे. परिणामी आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, कंगणानं मात्र आपण कोणत्याचं स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला नसल्याचं टीकाकारांना उत्तर देताना म्हटलं आहे. तर ज्येष्ठ सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी कंगणाची पाठराखण केल्यानं राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘बाबासाहेब मला नेहमी म्हणायचे…’; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

 “धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा”

‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला

  ‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण