मुंबई | मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद आता उफाळून आल्याचं दिसतंय. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेकडून खिंड लढवण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
अशातच आता किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत थेट इशारा देखील दिला आहे. त्यावेळी त्यांनी आणखी काही गंभीर आरोप केले आहेत.
2019 मध्ये रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला, उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचं टॅक्सेसचं पेमेंट केलं. मग मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी ते पाडले असतील तर मला माहिती नाही, असंही सोमय्या म्हणाले.
लबाडी, घोटाळा आणि फसवणूक उद्धव ठाकरे तुम्ही कारवाई केव्हा घेणार आहात?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. बेनामी संपत्तीची पाहणी करायला किरीट सोमय्या गेले तर किरीट सोमय्याला लगेच नोटीस पाठवली, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
मी उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रुझ पोलीस चौकीत हजर होणार आहे, तेव्हा जर तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा, असा थेट इशारा त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्नीवर अन्याय केलाय. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले रात्री पावनेतीन वाजता जाऊन गायब करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिशा सालियान प्रकरणी नारायण राणेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…
“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!
“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…”
Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले