फोरव्हिलर घ्यायचा विचार करताय आणि सनरुफ हवंय, तर हे आहेत सर्वात जबरदस्त पर्याय!

मुंबई | जगभरात कारप्रेमींची कमी नाही. अनेकांना वाटत असतं की आपल्याकडे देखील एखादी कार असावी. सनरुफ कारची तर बातच निराळी आहे. सनरुफ कारबद्दल लोकांना एक वेगळं आकर्षण असतं.

सनरुफ कार पाहिल्यावर अनेकांना वाटतं की, ही कार महागडी असावी. मात्र, काही सनरुफ कार अशा देखील आहेत ज्या अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत.  आज आपण अशाच काही कारविषयी जाणून घेवूयात.

स्वत किंमतीत सनरुफ देणाऱ्या कारपैकी एक कार म्हणजे टाटा हॅरियर. टाटा हॅरियरमध्ये 1956 सीसीचे इं.जिन देण्यात आले आहे. ही कार 5 सीटची सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. ही एसयुव्ही कार सनरुफ आहे. सनरुफ देणाऱ्या या कारची किंमत 13.69 लाख रुपयांपासून सुरु होते.

तसेच अगदी स्वस्तात सनरुफ देणाऱ्या कारमध्ये पुढची कार म्हणजे ह्युंदाई क्रेटा. ह्युंदाई क्रेटामध्ये 1497 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. 5 सीटची एसयुव्ही असणारी ही कार  16.8 प्रती लीटरचं मा,यलेज देते. या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरु होते.

किआ सेल्टोस या कारमध्ये देखील अगदी स्वस्त किंमतीत सनरुफ उपलब्ध आहे.  किआ सेल्टोस ही एक 5 सीटर सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. ही कार 20 लिटर प्रती लिटरहुन अधिक मा.यलेज देते. या कारची किंमत 9.89 लाख रुपयांपासून सुरु होते.

तसेच ह्युंदाई व्हेन्यू ही कार देखील अगदी स्वस्त किंमतीत सनरुफ उपलब्ध करून देते. ही एक 5 सीटर सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ही कार केवळ 6 लाख रुपयांपासून सुरु होते. अगदी स्वस्तात सनरुफ उपलब्ध करून देणाऱ्या कारपैकी ही एक कार आहे.

दरम्यान, अलीकडे बाजारात अनेक नवनवीन गाड्या येत आहेत. यामुळे ग्राहकांना भरपूर ऑप्शन्स उपलब्ध होत आहेत. मात्र, सध्या भारतात जर तुम्ही स्वत किंमतीत सनरुफ कार घेण्याचा विचार करत असाल तर वर दिलेल्या गाड्या अगदी बेस्ट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-