औरंगाबाद | कोरोना महामारीनं तर जगभरात हाहाकार माजवला आहे. या काळात सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत.
जवळजवळ कोरोनाला आता दोन वर्ष झाले. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.
कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.
यातच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला नसेल तर आता पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार नाही, असा निर्णय औरंगाबादचे जिल्ह्याधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेल घ्यायचं असले तर औरंगाबादकरांना लसीचा पहिला डोस घेणं आवश्यक आहे.
या निर्णयासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असतानाच औरंगाबादचे जिल्ह्याधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यात अगदी कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यापैकी औरंगाबादचा 26 वा क्रमांक लागला आहे. त्यामुळे जास्त लसीकरणासाठी जिल्ह्यांधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल”
‘बिग बाॅस 15’: अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर