‘हिंमत असेल तर…’; अनिल परबांचं थेट आव्हान

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दापोली दौऱ्यावरुन कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे.

सोमय्यांच्या या दौऱ्यात अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आपण तोडून दाखवणारच असा इशारा त्यांनी दिलाय.

सोमय्यांच्या या आक्रमक पवित्र्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आखीनच चिघळत चालल्याचं पहायला मिळत आहे.

अनिल परब (Anil Parab) यांचं दापोली तालुक्यातील मुरूड इथलं रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा असं आव्हान परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.

संबंधित रिसॉर्ट माझं नसल्याचं अनिल परबांनी म्हटलंय. यासंबंधी ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे, असं ते म्हणाले.

माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सोमय्या करत आहेत. म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, असा इशाराही परबांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘अनिल परबांचं रिसाॅर्ट तोडून दाखवणार’; किरीट सोमय्या आक्रमक

  Gold Rate: सोन्याच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, पाहा फोटो

  ‘सेनेचं मानसिक संतुलन बिघडलंय’; चित्रा वाघ भडकल्या

  ‘आमदारांना मोफत घर मिळणार नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं