Top news आरोग्य कोरोना

तुमच्यात ‘ही’ 5 लक्षणे दिसत असतील तर तुम्हालाही कोरोना होऊन गेलाय, असं समजा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोना लशीवर संशोधन करत आहेत. काही देशांमध्ये या लशीचं वितरण सुरु करण्यात आलं आहे. तर काही देशांमध्ये या लशींवर काम सुरु आहे.

कोरोना लशी बरोबरंच जगातील कित्येक शास्त्रज्ञ कोरोनाचे दुष्परिणाम त्याची नवीन लक्षणे इत्यादी गोष्टीवर देखील संशोधन करत आहेत. अशातच आता एका अभ्यासामध्ये करोनाचा संसर्ग होऊन गेल्याचं दर्शवणारी पाच लक्षणं सांगितली आहेत.

अ‍ॅनल्स ऑफ क्लिनिकल अ‍ॅण्ड ट्रान्सलेशनल न्यूरोलॉजी या जर्नलमध्ये करोना संदर्भातील एका अभ्यासाचा सविस्तर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी कोरोनातून बरे झालेल्या 412 रुग्णांची पाहणी केली आहे. या रुग्णांवरून करोना होऊन गेल्याची लक्षणं काय आहेत आणि करोना होऊन गेल्यानंतर कोणती लक्षणं दिसू शकतात हे या अहवालात सांगितलं आहे.

1. डोकेदुखी – डोकेदुखी हे कोरोनाच्या लक्षणांपैकी एक लक्षण असल्याचं शास्त्रज्ञांनी अगोदरच सांगितलं आहे. अगदी सौम्य डोकेदुखीपासून ते डोक ठणकण्यापर्यंतचा त्रास कोरोना असताना किंवा होऊन गेल्यानंतर अल्पश्या प्रमाणात जाणवू शकतो होऊ शकतो.

2. स्नायूंचे दुखणे – अ‍ॅनल्स ऑफ क्लिनिकल अ‍ॅण्ड ट्रान्सलेशनल न्यूरोलॉजीतील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासानुसार स्वयंसेवकांपैकी 44.8 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाल्यावर स्नायू दुखण्याचा त्रास होऊ लागला होता. यावरून स्नायू दुखणे हे देखील कोरोनाच्या लक्षणापैकी एक असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

3. सतत गोंधळने
– विचार करताना गोंधळ होत असल्याचं देखील अ‍ॅनल्स ऑफ क्लिनिकल अ‍ॅण्ड ट्रान्सलेशनल न्यूरोलॉजीच्या संशोधनात सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांनी सांगितलं आहे. संशोधनात सहभागी झालेल्या 31.8 टक्के स्वयंसेवकांना हा त्रास जाणवला होता.

4. चव जाणे आणि वास न येणे – जिभेला कोणत्याही गोष्टीची चव न समजणे आणि वास न येणे हे कोरोनाच्या सर्वसामान्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आले होते.

5. डोळ्यांना त्रास होणे – कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांनी डोळे चुररत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना काळात मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यानं असं होत असतं.

महत्त्वाच्या बातम्या-

…अशा प्रकारे भाजपचे आमदार फुटणार; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ फॉर्म्युला

“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या आणि चमचा…”

ईशाने बाथरूम मधून शेअर केला ‘तो’ पर्सनल फोटो, सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा फोटो

मोठी बातमी! गिरीश महाजन यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल, धमकी देत चाकूने…

धक्कादायक! ‘त्या’ प्रकरणी करण जोहर अडकला, एनसीबीकडून समन्स