कोरोनाशी लढायचे असेल तर ‘हा’ उपाय करा, वाचा सविस्तर

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. आता तर सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे.

कोरोनाचा सामाना करता-करता अनेक लोकांचा मृत्यूही होत आहे. परिस्थिती खूपच भयंकर होत चालली आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. योगासने, व्यायाम, नियमित आहार घेणे याकडे काळजी पूर्वक लक्ष देऊ लागले आहेत.

कोरोना काळात काय केल्याने आपण या महाभयंकर कोरोना नावाच्या विषाणूशी लढू शकतो. यावरील एक उपाय सांगणार आहोत. याबद्दलची सर्व माहिती, त्याचे आपल्या शरिराला काय आणि कोणते फायदे होतात, याची देखील माहिती देणार आहोत.

कपालभाती प्राणायमामुळे कोरोना या विषाणूचा सामना करू शकतो. कपालभाती हा प्राणायाम केल्याने आपली फुफ्फुसांची क्षमता वाढते. त्याचबरोबर आपल्या शरिराची रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

कपालभाती प्राणायाम कसा करावा-

सर्वात आधी आरामात बसा. त्यानंतर आपली कंबर सरळ ठेवा आणि डोळे बंद करा. त्यानंतर आपल्या हाताचे तळवे गुडघ्यांवर ठेवा आणि तयार व्हा. पूर्णपणे श्वास सोडा. नाकातून श्वास घ्या आणि वेगाने सोडा. आता आपलं पोट आत खेचा आणि पोटाच्या बळाने फुफ्फुसांमधून पूर्ण हवा बाहेर काढा.

जेव्हा आपण आपल्या पोटाला आराम द्याल तेव्हा आपला श्वास आपल्या फुफ्फुसात जाईल. कमीत-कमी एका आवर्तनात असे 20 स्ट्रोक म्हणजेच श्वास घ्या. एक आवर्तन झाल्यानंतर आहे त्या अवस्थेत (बसलेल्या अवस्थेत) डोळे न उघडता आराम करा. तुम्ही तुमच्या क्षमतेनूसार या प्राणायमाची 2 आणखी आवर्तने करू शकता.

कपालभाती प्राणायाम कधी करावा-

कपालभाती किंवा इतर कोणतेही प्राणायम हे सकाळी काही न खाता करावेत. परंतू ज्या लोकांना सकाळं जमत नाही अशा लोकांनी रात्रीही करू शकता. परंतू जर तुम्ही जेवण केलं असेल, तर हा प्राणायाम तुम्ही जेवण झाल्याच्या दोन तसांनी करू शकता.

महत्वाच्या बातम्या-

रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असलेली रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये…

4 वर्षाचा असताना आई गेली अन् वडिलांनी…., अशा प्रकारे…

कौतुकास्पद! कोरोनाकाळात पैसे नसल्याल्यांची ‘ती’…

मास्क नाही घातलं म्हणून पोलिसांनी जोडप्याला आडवलं तर बाई…

कौतुकास्पद! तहानलेल्या माकडाची अशापद्धतीने तहान भागवली, पाहा…