पुण्यातील सभेवरून दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान, म्हणाल्या…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आपल्या सभांमधून आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना सभेपूर्वी डिवचलं आहे.

राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार असून तत्पूर्वी त्यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यतील सभेपूर्वी दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे.

सभा करायच्याचं असतील तर अयोध्येमध्ये करून दाखवा. पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवकही सभा घेतात तेही जास्त गर्दी करून, असा टोलाही दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन येत्या 21 मे रोजी डेक्कन जिमखाना येथे मुठा नदीपात्रातील जागेत करण्यात आलं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे, असं मनसेचे पुणे शहर चिटणीस अजय शिंदे यांनी सांगितलं.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तर मनसे कार्यकर्त्यांच्या नोंदणी मोहिमेस देखील लवकरच सुरूवात होणार आहे.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे काहीचं कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त ती देतील, असं गृहमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या तीन सभांमधून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा ट्विट-  

महत्त्वाच्या बातम्या- 

अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा

रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ

शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा