“तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये…”; हिजाब वादात कंगना रणौतनची उडी

मुंबई | सध्या देशभरात कर्नाटकमधील हिजाब प्रकारणावरून वाद सुरु आहे. हिजाब परिधान करुन महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात असल्याचं पहायला मिळत आहे.

कर्नाटक राज्य सरकारच्या ड्रेसकोडच्या नियमांनुसार, महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरीही मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब घालून आपल्या पालकांसह महाविद्यालयात गेल्या असता त्यांना महाविद्यालयाबाहेर उभं करण्यात आलं.

हिजाबवरून सुरु झालेल्या या वादावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनंही यावर प्रतिक्रिया दिली.

आनंद रंगनाथन यांनी “इराण 1973 आणि आता या पन्नास वर्षांमध्ये बिकिनीपासून ते बुरख्यापर्यंत जे इतिहासापासून धडा घेत नाहीत ते इतिहासाची पुनरावृत्ती करतात” असं कॅप्शन लिहित महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील महिला असा फोटो शेअर केला.

कंगनानं तो फोटो तिच्या स्टोरीमध्ये शेअर करत “जर तुम्हाला धाडस दाखवायचं असलं तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालून दाखवा. मुक्त व्हायला शिका, स्वत:ला पिंजऱ्यात अडकवू नका” असं कॅप्शन लिहिलं आहे.

हिजाब असो, बिकिनी असो, बुरखा असो की जीन्स असो तिनं काय घालायचं हे ठरवण्याचा अधिकार महिलांना आहे. भारतीय संविधानानं हा अधिकार दिला आहे. महिलांचा छळ करण्याचं थांबवा, असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

दरम्यान, या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तींच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्यास सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती अन्…”

  मास्क खरोखर बंद होणार?, अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती 

  विराट कोहलीलाही लागलं पुष्पाचं वेड, पाहा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ

  S.T Strike: एसटी संपाविषयी महत्त्वाची बातमी आली समोर

  काँग्रेस आमदाराच्या मुलीचा हॉट आणि बोल्ड अंदाज, पाहा फोटो