नवी दिल्ली | प्रधानमंत्री आवास योजना PMAY वेगाने चालू आहे, कारण सरकार 31 मार्च 2022 पर्यंत पात्र कुटुंबांना किंवा लाभार्थ्यांना घरे देण्याची योजना राबवत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2015 मध्ये सुरू केलेल्या या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील 2 कोटींहून अधिक पक्क्या घरांना पाणी कनेक्शन, शौचालय सुविधा आणि 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही एक सरकारी गृहकर्ज योजना आहे, ज्यामध्ये सरकार पात्र लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करतं. आता पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये सरकारकडून मोठे बदल करण्यात आले आहेत.
बदललेल्या नियमानुसार, जर तुम्हालाही या योजनेंतर्गत घराचा लाभ मिळाला असेल तर पाच वर्षांसाठी लाभार्थ्यांनी या घरांत राहणं बंधनकारक करण्यात आलंय. अन्यथा घर वाटप रद्द केलं जाऊ शकतं.
या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांनी संबंधित निवासस्थानांचा वापर केला किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी सरकारनं पाच वर्षांची सीमा निश्चित केलीय.
लाभार्थी संबंधित निवासस्थानी पाच वर्ष राहत असेल तरच हा करार ‘लीज डीड’मध्ये रुपांतरीत केला जाईल.
अन्यथा विकास प्राधिकरणाकडून लाभार्थ्यांसोबत करण्यात आलेला करार रद्दबादल ठरवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही जमा केलेले पैसेही परत मिळणार नाहीत. या नव्या नियमांमुळे पंतप्रधान आवास योजनेचा गैरवापर बंद होईल.
दरम्यान, सुधारित नियम आणि अटींनुसार, शहरी भागांत पंतप्रधानआवास योजनेंतर्गत बनवण्यात आलेले फ्लॅट ‘फ्री होल्ड’ होणार नाहीत. पाच वर्षानंतरही नागरिकांना इथे ‘लीज’वरच राहावं लागणार आहे. यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन घर मिळवून ते भाड्यानं देणाऱ्यांना चाप बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी विधानसभा गाजवली, कोकणाची बुद्धिमत्ता कशी आहे ते दाखवून दिलंय”
सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता
“राज्यात सत्ताबदल होणार, नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार”
शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण