“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर…” जीन्सच्या नादात कंगना पून्हा वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई |  बॉलिवूडमधील अभिनेञी कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. कंगना तिच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगनाच्या ट्विटरवरील नव्या ट्विटनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलय.

उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंञी तीरथ सिंग रावत यांनी महिलांवर त्यांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाना  साधला आहे. फाटक्या जीन्सच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टिका करण्यात येत आहे.

अशातच सध्या फाटक्या जीन्सवरून चालू असलेल्या या वादात कंगनाने उडी घेतली आहे. कंगनाने ट्विटरवर एक ट्विट केला असून, तो ट्विट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कंगनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ती चांगली दिसत असून यात तिची स्टाईल चांगली को आहे, हे कंगनाने सांगितले आहे.

“जर तुम्हाला फाटलेली जीन्स परिधान करायची असेल, तर ती तुम्हाला या फोटोमध्ये जसे दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही कूल दिसायला पाहिजे, भिकारी असल्यासारखे नाही.” असं ट्विट करत कंगनाने तीरथ सिंग रावत यांच्या वक्तव्यावर स्वत:चे मत मांडले.

मुख्यमंञी तीरथ सिंग रावत म्हणाले, ” एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना जवळ घेऊन बसली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचयं ? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे. तसेच ती महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते.”

“ही महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं. तरूणांमध्ये व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबर आपल्याला सर्व विकृतींपासून दूर ठेऊन संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृताच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल.” असं विधान रावत यांनी केलं होत.

तसेच, त्यांच्या या वक्तव्यावर सर्वप्रथम ‘बिग बी’ यांची नात नव्या नवेली हिने टिका केली होती. तिनं स्वत:चा रिप्ड जीन्समधील फोटो शेअर करत रावत यांच्या वक्तव्याला विरोध दर्शवला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

रोज वेलची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या! पुण्यात आज ‘इतके’ रुग्ण कोरोनाबाधित

शेवटच्या चार षटकांसाठी कर्णधार झाला अन् त्यानं गेलेला सामनाच…

जब्याच्या शालूनं लावली सोशल मीडियावर आग; ‘या’ गाण्यावरील अदा…

“…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोग्यमंत्री…

नागपूरात पोलिसांनी हटकल्यानं महिलेचा भररस्त्यात राडा,…