भारतात कोरोनाची तिसरी लाट येणारच; तज्ज्ञांनी सांगितली तारीख

नवी दिल्ली | सध्या सर्वत्र ओमिक्राॅन या एकाच नावानं धुमाकूळ घातला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमधून आलेला हा विषाणू सध्या नागरिकांच्या आणि सरकारच्या चिंतेचं प्रमुख कारण बनला आहे.

युरोपीयनं देशांमध्ये सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. परिणामी जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर काही देशांमध्ये निर्बंध लावण्यात येत आहेत.

जगभरात ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्यत प्रचंड मोठी वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 200 हून अधिक रूग्ण आढळले आहेत. परिणामी केंद्र आणि राज्य सरकार लवकरच काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वाधिक नुकसान केलं होतं. परिणामी आता नागरिकांना तिसऱ्या लाटेमध्ये किती नुकसान होणार याची चिंता लागली आहे. कारण कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तिसरी लाट येण्याबाबत आता कानपूर आयआयटीच्या तज्ज्ञांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात लवकरच तिसरी लाट येणार आहे. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत ही लाट येण्याची शक्यता आहे.

3 फेब्रुवारीपर्यंत देशात ओमिक्राॅनच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होईल असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. परिणामी सध्या ओमिक्राॅनला काय करून रोखता येईल याबाबत सरकार विचार करत आहे.

कानपूर आयआयटीमधील या संशोधकांनी भारतामधील करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात हा निष्कर्ष गॉजियन मिक्सर मॉडल या स्टॅटिस्टीकल टूलच्या माध्यमातून काढलाय.

ऑनलाइन प्रीप्रिंट सर्व्हर मेडीरेक्व्हीने प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये जगभरातील करोना संसर्गाच्या ट्रेण्डचा अभ्यास करण्यात आलाय. परिणामी सध्या कानपूर आयआयटीच्या या अभ्यासानं सर्वांना काळजीत टाकलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारन सर्व राज्यांना रात्रीच्या वेळी नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. परिणामी आता लाकडाऊनचा विचार सरकार करणार याबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या –

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल