“मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच”

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवरून राज्यातील राजकारण दिवसेंदिवस पेटत असल्याचं पहायला मिळतंय. नाना पटोले यांचे वकिल सतीश उके यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. संजय राऊत यांनी गृहखात्याच्या कामकाजावरून राष्ट्रवादीला सल्ला दिला होता. त्यावरून आता राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे.

सतीश उके आणि कुटुंबियांवर कारवाई करण्यात आली त्यात ईडीने येऊन धाड टाकून तपास करावा असा गुन्हा नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ईडीने आणि सीबीआयने येण्याची गरज नाही. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांना आणलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. पाच राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलचे भाव वाढवत एप्रिल फूल केलं. एप्रिल फूल हा आता गंमतीचा विषय राहिला नसून जगण्या मरण्याचा प्रश्न जनता आणि सरकार यांच्यात झालाय, असं राऊत म्हणालेत.

पीओके भारतात येणार हे एप्रिल फूलच आहे. सात वर्षांपासून बेरोजगार वाट पाहत आहेत. महाराष्ट्र आणि देशात सूडाचं करणं एप्रिल फूलच आहे, असा टोला देखील राऊतांनी लगावला. मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच आहे. पण मी आता जखमेवरील खपली काढू इच्छित नाही, असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

“शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता”

Sharad Pawar: शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री ठाकरे गृहखात्यावर नाराज?, दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं…

Video | गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडचा भररस्त्यात राडा; डिलिव्हरी बॉय सोडवायला गेला अन् भलतंच घडलं…