महाराष्ट्र मुंबई

हरितपट्ट्यात राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांचंच बेकायदा बांधकाम???

मुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या ‘शिवतेज’ संस्थेने खेडमधील हरितपट्ट्यावर बांधकाम केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका वीरसेन धोत्रे यांनी उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केली आहे. 

उच्च न्यायालयाने वीरसेन यांच्या याचिकेची दखल घेत शिवतेज संस्थेला नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकेवर सुणावणी करण्यात आली. 

आरोग्य संस्थेचे बांधकाम हे आवश्यक त्या पर्यावर्णीय परवानग्या घेऊनच करण्यात आलं आहे, असा दावा संस्थेने बुधवारी उच्च न्यायालयात केला.

बांधकामासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या असतील तर त्या प्रतज्ञापत्राद्वारे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राम कदम यांना दिले आहेत. 

खेड नगरपरिषदेने त्यांच्या हद्दीत असलेला एक राखीव भूखंड 99 वर्षांच्या कराराने नाममात्र भाडेपट्टीवर रामदास कदम यांना दिला आहे. हरितपट्टा असताना संस्थेकडून त्या जागेवर निवसी योजनेचे काम करण्यात येत आहे, असं याचिकेत सांगितलं आहे. 

संबंधित बांधकाम तोडण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्यावर कोणतीही पूर्तता झाली नाही, असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-भावाविरोधात कारवाई केल्याने मायावती भडकल्या; म्हणतात…

-वंचितची स्वबळावर लढण्याची तयारी; 30 जुलैला जाहीर करणार विधानसभेची पहिली यादी!

-नवी मुंबईत ‘राष्ट्रवादी’ला खिंडार?; 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर???

-पराभवानंतर पार्थ मतदारसंघात फिरकलेच नाहीत; अजित पवार म्हणतात…

-आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला निकाल आणि झुकलं पाकिस्तान; घ्यावा लागला ‘हा’ निर्णय

IMPIMP