हा देश आता मुस्लिमांचा राहिला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या मुलीला खंत

श्रीनगर | भारत हा देश मुस्लिम लोकांचा राहिलेले नाही, असं ट्वीट मेहबूबा मुफ्ती यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. काश्मिरमधून कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हापासून त्यांची सोशल मीडिया अकाऊंटस् त्यांच्या कन्या इल्तिजा जावेद या सांभाळतात.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्याबाबतची ‘इंडिया टुडे’ची बातमी रिट्वीट करत इल्तिजा जावेद यांनी हा देश मुस्लिमांचा राहिला नसल्याचं म्हटलं आहे.

मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा जावेद देशातल्या तसेच काश्मिरबाबतच्या विविध मुद्यांवर आपलं मत मांडतात. आताही नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत ट्वीट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसकडूनही कडाडून टीका करण्यात आली आहे.

मेहबूबा मुफ्ती यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलेलं ट्वीट-

 

महत्वाच्या बातम्या-