“…तर भारतात Corona ची भयंकर तिसरी लाट येणार”

नवी दिल्ली | कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) जगभर धुमाकूळ घातला आहे. याची सुरुवात दक्षिण अफ्रिकेमधून झाली होती. मात्र आता भारतामध्ये देखील या विषाणूने शिरकाव केला आहे. अशात IMA ने दिलेल्या इशाऱ्यानं सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कठोर पावलं उचलली नाही तर कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे भयंकर तिसरी लाट (COVID-19 Third Wave India) येऊ शकते, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने दिला आहे.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल आणि सरचिटणीस जयेश एम. लेले यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले आहेत. यात  राज्यांत ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण समोर आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तींना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.

ओमिक्रॉन आता जगातील 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. हा व्हेरियंट डेल्टापेक्षा कमी घातक असला तरी याचा फैलाव डेल्टापेक्षा पाच ते दहा पटीने जास्त आहे. त्यामुळेच आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल, असं IMA ने सांगितलं आहे.

कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे व्हायला हवे. प्रवासबंदी घालण्याची गरज नाही मात्र गरज असेल तरच प्रवास करा, असा आमचा सल्ला राहील. सरकारने प्रामुख्याने गर्दी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत, असं आयएमएनं म्हटलं आहे.

दरम्यान, बंगळुरू मध्ये ओमिक्रॉनची लागण झालेला डॉक्टर बरा झाल्यानंतर पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. हा डॉक्टर भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या दोन प्रकरणांपैकी एक होता.

मूळ गुजराती असलेला हा रुग्ण संक्रमित झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आला होता. मात्र प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता तो दुबईला गेला. दुसरीकडे, जो डॉक्टर ओमिक्रॉननं संक्रमित झाला होता, तो पुन्हा पॉझिटिव्ह आल्याचं बंगळुरू महापालिकेनं म्हटलं आहे.

संबंधित डॉक्टर आयसोलेशनमध्ये आहे. अजून त्यामध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. लसींचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. शिवाय कोणताही प्रवास मागील काळात केलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड 

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार” 

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर 

Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला