“‘त्या’ आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा”

औरंगाबाद | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत अनेक जण सहभागी झाले होते. त्यातील आरटीआयचे कार्यकर्त्ये नदीम राणा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यावर जलील यांनीही त्या कार्यकर्त्याबाबत भाष्य केलं आहे. आपल्यावर तिरंगा रॅलीत झाल्याचा आरोप करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

तो कार्यकर्ता ब्लॅकमेलर आहे. त्याने तिरंगा झेंडा खाली पाडला म्हणून त्याला कार्यकर्त्यांनी मारलं. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात आणून चांगला चोप द्यायला हवा, असंही जलील म्हणाले आहेत.

माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला मारलं त्याचं मी समर्थन करतो. मी पोलिसांना विनंती करतो, त्या कार्यकर्त्याचे हात पाय तोडा. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून बेदम झोडपा, अशी विनंतीही जलील यांनी केली आहे.

दरम्यान, नदीम राणा यांनी काहीदिवसांपूर्वी जलील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या रागातून हा हल्ला झाला असल्याचे राणा म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“साहेब…तुमच्यासाठी हा जितेंद्र जीव द्यायला तयार आहे”

-नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही; शिवसेनेची बोचरी टीका

-पुणेकरांनो शिवभोजनाचा आस्वाद घ्यायचाय; ‘या’ ठिकाणी मिळणार 10 रुपयांत थाळी

-ग्रामस्थांनी ठेवला नवा आदर्श; सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

-याला म्हणतात संस्कार! रितेश आणि जेनेलियाच्या मुलांनी जिंकलं मन