तंत्रज्ञान

मोबाईल तसेच लॅपटॉपवर ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

मुंबई : मोबाईल तसेच लॅपटॉपवर पॉर्न व्हीडिओ पाहणारे अनेकजण आहेत. आपण पॉर्न पाहतो हे कुणाला कळू नये म्हणून अनेकजण ब्राऊझरच्या इन्कॉग्निटो मोडचा वापर करतात, असं केल्यानं आपली माहिती कुणाला कळणार नाही, असा त्यांचा समज असतो. मात्र हा समज खोटा आहे. यासंदर्भातील एका अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुगल, फेसबुकसह ऑरॅकल क्लाईड अशा लोकांवर नजर ठेऊन असतात असं समोर आलं आहे.

इन्कॉग्निटो मोडवर पॉर्न बघणाऱ्या लोकांवर गुगल किंवा फेसबुक गुप्त स्वरुपात नजर ठेवते, असं स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विद्यापीठ आणि पेन्सेल्वेनिया विद्यापीठाच्या एकत्रित अहवालात समोर आलं आहे. ही माहिती अत्यंत धक्कादायक अशी आहे.

वेबएक्सरे नावाच्या उपकरणाच्या आधारे त्यांनी जवळपास 22 हजार 484 पॉर्न साईट्स स्कॅन केल्या. त्यानुसार जवळपास 93 टक्के वेब पेज युझर्सचा खासगी डाटा थर्ड पार्टीला विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोण कसं-कसं कुणा-कुणाला ट्रॅक करतं?

74 टक्के पॉर्न वेबसाईटला गुगल आणि इतर कंपन्या ट्रॅक करतात. तर ऑरेकल ही सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कंपनी 24 टक्के पॉर्न साईट्सला ट्रॅक करते. विशेष म्हणजे फेसबुकही 10 टक्के पॉर्न वेबसाईटला ट्रॅक करतं. ही सर्व माहिती या अहवालातून समोर आली आहे. 

इन्कॉग्निटो मोड नेमकं काय करतो?

इन्कॉग्निटो मोड हा सुरक्षित ब्राऊझिंगसाठी ओळखला जातो. आपण हा मोड न वापरता काही गोष्टी सर्च केल्या तर त्याची हिस्ट्री ब्राऊझरमध्ये सेव्ह राहते. तसेच कुकीजही सेव्ह राहतात. आपल्या या माहितीचा वापर अनेकदा गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांकडून होत असतो. आपल्याला दिसणाऱ्या जाहिराती साधारणतः यावरच अवलंबून असता. 

इन्कॉग्निटो मोड वापरल्याने हिस्ट्री ब्राऊझरमध्ये सेव्ह होत नाही. त्यामुळे आपण काय सर्च केलं, कुठल्या वेबसाईटवर होतो?, किती वेळ होतो?, कोणता व्हीडिओ पाहिला? याची माहिती याची माहिती कुणाला पाहता येत नाही. मात्र हे आता फोल ठरल्याचं दिसतंय. 

ब्राऊझरमध्ये जरी ही माहिती सेव्ह राहात नसली तर थर्ड पार्टी कंपन्या आपल्या या हालचालींवर नजर ठेवतात आणि आपली माहिती पोर्न कंपन्यांना विकतात, असं समोर आलं आहे.

त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन पॉर्न बघत असाल तर सावधान! इतरांनाही सावध करा!!!

महत्वाच्या बातम्या-

-रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना कोण-कोण भेटतं; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

-‘बीव्हीजी’चे मालक हणमंतराव गायकवाडांना 16 कोटी रुपयांना फसवलं

-काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर; हे 13 दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर

-…तर या दिवशी प्रकाश आंबेडकर, अजित पवार आणि राज ठाकरे एकाच मंचावर?

-हरितपट्ट्यात राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांचंच बेकायदा बांधकाम???

IMPIMP