मुंबई | कोरोना आणि लॉकडाऊच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. याचा परिणाम आज शेअर बाजारावर पडलेला दिसून आला.
आज बाजार उघडताच 1100 अंकांची उसळी पाहायला मिळाली. निफ्टीमध्ये देखील 280 अंकांची उसळी पाहायला मिळाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक पॅकेजने शेअर बाजारात समाधानाचं वातावरण आहे.
कोरोनाचं संकट जगभरात गहिरं होत असताना जगातले शेअर बाजार गडगडत होते. मात्र भारताच्या पंतधानांनी विशेष आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
दरम्यान, अर्थमंत्री निर्माला सीतारामन आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भरता पॅकेजविषयी माहिती देणार आहे. हे पॅकेज लघु आणि मध्यम उद्योग, गोरगरीब, कामगार-मजुर यांच्यासाठी दिलासा देणारं असेल, असं मोदी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी”
-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे- एकनाथ खडसे
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार
-आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी