‘राष्ट्रपती लागवट लागू करा’; म्हणणाऱ्यांवर जयंत पाटीलांनी साधला निशाणा, म्हणाले…

सांगली | सचिन वाझे यांच्या अटकेनंतर सरकारने मुंबई पोलिस दलात अनेक बदल केले. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

या मुद्यावरुन विरोधीपक्ष नेते महाविकास आघाडीवर वारंवार टीका करत आहे. एवढच नाहीतर अनेक विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यात राष्ट्रपती लागवट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

महिन्यात दोन-तीन वेळा विरोधी पक्ष राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी करत असतो. यात नवीन काही नाही, असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. जयंत पाटील यांनी प्रसाद माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात काहीह झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होते. नुकतीच भाजपसह नवणीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यजक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रीमंडळात फेरबदल केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मंत्री मंडळात कोणत्याही प्रकारचे फेरबदल करण्याची आवश्यकता नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

त्याचप्रमाणे शरद पवार यांनी भूमीका बदलली असल्याचं बोललं जात होतं. त्यावर शरद पवार यांनी त्यांची भूमीका बदलली हा आ.रोप चुकीचा आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच गृहमंत्री यांच्यावर झालेल्या आ.रोपांची शहानिशा केली जात आहे. त्या आ.रोपांवर तपशीलात जाऊन तपासणी केली जात असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात वा.दाची ठिंणगी पडली आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात आ,रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगू लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मला किस करशीर का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…

“न्यायव्यवस्थेचा प्रयत्न करुन सरकारवर दबाव आणण्याचा…

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत; वाढवलं तब्बल ‘इतकं’…

“मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतित…

सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला राष्ट्रीय…