‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; भाजपच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

मुंबई |  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक केली आहे. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असं नारायण राणे यांनी त्या पत्रात लिहिलं आहे.

सचिन वाझे यांना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच राज्यात बेकायदेशीर कामं सुरु आहेत. वाझेंच्या जीवावरच शिवसेनेकडून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच वाझे आणि शिवसेना नेत्यांमध्ये संबंध असल्याचा आ.रोप नारायण राणे यांनी केला आहे.

वोझेंची पोलिस दलात पोस्टिंग कोणी केली. पोलिस दलात सचिन वाझे यांचा गॉडफादर कोण आहे? वांझेंना कोण वाचवतय याची माहिती उघड झाली पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अखेर सचिन वाझे यांना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली. या सचिन वाझे आणि त्यांच्या गॅगला पाठीशा घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि परिषदेत सचिन वाझे ओसाना बीन लादेन आहे का, असा शब्द प्रयोग केला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् शिल्पाने सेटवरच त्याच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ