‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

मुंबई | सर्दी-ताप-खोकला अशी लक्षणं दिसली तरी मला कोरोना तर झाला नाही, अशीच शंका मनात येते. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरही आपल्याला व्हायरल ताप असल्याचं सांगतात. अशात कोरोना टेस्ट (Corona test guidelines) करावी की नाही आणि हो तर कधी करावी? असा प्रश्न सर्वांंना पडतो.

कुणी कोरोना चाचणी करावी आणि कुणी नाही याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) यादी जारी केली आहे. त्यामध्ये अगदी कोरोनाचा जास्त धोका नसलेल्या आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी करू नये, असं सांगण्यात आलं आहे. मग डॉक्टरांनी सर्दी किंवा व्हायरल ताप सांगितला पण आपल्याला कोरोना झाल्याची शंका वाटत असेल तर कोरोना टेस्ट करावी की नाही? याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

आता सर्दीच्या विषाणूपेक्षा कोरोनाचे विषाणू जास्त आहेत. त्यामुळे सर्दी, ताप खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणं यापैकी कुठलीही दोन लक्षणं असली तरी तुम्ही कोरोना टेस्ट करूनच घ्याल, असं आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.

लक्षणं जाणवतील त्याच दिवशी किंवा फार फार तर दुसऱ्या दिवशी टेस्ट करावी. यावेळी तुम्ही कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येईल त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात उशीर करू नका. शिवाय आरटी आरटी-पीसीआर टेस्टच करा. घरच्या घरी टेस्ट करू नका, असं ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या एका वर्षात डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही कोणती गोळी वापरली आहे? आठवत नसेल तर हरकत नाही. तुम्हाला तुमच्या मनावर जास्त ताण देण्याची गरज नाही.

एकतर तुम्ही क्रोसिन किंवा डोलो 650 घेतली असेल. या काळात संपूर्ण भारताने कोणती गोळी वापरली तर त्यावर एकच उत्तर आहे. ते म्हणजे Dolo 650. गेल्या एका वर्षात सर्वाधिक वापरला जाणारा टॅबलेट बनली आहे.

मार्च 2020 पासून 567 कोटी रुपयांच्या डोलो 650 टॅब्लेटची विक्री झाली आहे. एवढेच नाही तर या गोळीला कोरोनाच्या काळात आवडता ‘स्नॅक’ म्हटलं जात आहे.

एका वर्षात त्याची इतकी विक्री झाली की गेल्या आठवड्यात #Dolo650 सोशल मीडियावर मेम फेस्टमध्ये ट्रेंड करत होता. या काळात ही गोळी इतकी का वापरली गेली, डॉक्टरांनी ही गोळी रुग्णांसाठी एवढी का लिहिली? असे प्रश्न सगळ्यांना पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा