नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची

सिंधुदुर्ग |  राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारं प्रकरण कोकणच्या समृद्ध राजकारणात घडलं होतं. भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसैनिकावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या जोरदार कलगीतूरा रंगलेला दिसत असला तरी यापेक्षा जोरदार वाद हा शिवसेना आणि राणे कुटुंबामध्ये पहायला मिळत असतो.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून सातत्यानं हा वाद उफाळून आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तर राणे आणि शिवसेनेतील वादानं भयानक प्रसंग पाहीले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली. बॅंकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आणि राणे यांच्या गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता.

महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिवघेणा हल्ला झाला त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा आणि सत्र न्यायालयानं राणेंचा जामीन पुन्हा फेटाळला आहे. परिणामी आता नितेश राणे यांना पोलीस कधीही अटक करू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

निलेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवल्यानं न्यायालयाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत आता पोलीस सर्वेोच्च न्यायालय आणि सिंधुदुर्ग न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून कारवाई घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी न्यायलयाबाहेरच त्यांची गाडी अडवली. त्यावेळी नितेश राणे चांगलेच भडकल्याचं पहायला मिळालं. कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा, असा वरच्या आवाजात राणेंनी यावेळी पोलिसांना प्रश्न केला.

सिंधुदुर्ग न्यायालयानं जामीन नाकारल्यानं नितेश राणे यांनी परत एकदा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अशा परिस्थितीत कणकवली पोलीस राणेंना कधीही अटक करू शकतात, असं वक्तव्य वकील प्रदीप घरत यांनी केलं आहे.

दरम्यान, नितेश राणे प्रकरणात महाविकास आघाडीकडून पोलीस प्रशासनाच्या ताकतीचा चुकीचा वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर

क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा 

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा 

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा