नवी दिल्ली | देशाचे पहिले CDS जनरल बीपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. जनरल बीपीन रावत यांच्या मृत्यूनंतर हा अपघात नेमका कसा झाला?, याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या.
CDS जनरल बीपीन रावत हे सैन्याच्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. सर्वात सुरक्षित हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतानाही जनरल बीपीन रावत यांचा अपघात झाला. यामुळे सुरक्षा यंत्रणेच्याही भुवया उंचावल्या.
डिसेंबर महिन्यात झालेल्या या दुर्घटनेत बीपीन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती.
एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या समितीने याप्रकरणाची चौकशी पूर्ण केली असल्याची माहिती आहे. या तपासातून CDS जनरल बीपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशमागील महत्वाचं कारण आता समोर आलं आहे.
जनरल बीपीन रावत प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाले असल्याचं समितीच्या चौकशीतून समोर आल्याचं सांगितलं जात आहे.
हा अहवाल कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवला आहे. यासंदर्भातील अहवाल लवकरच वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे.
वायुसेनेच्या वतीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, या अपघाताचा तपास करत असलेल्या समितीच्या अहवालात अनेक महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
खराब हवामानामुळे वैमानिक विचलित झाले असावे आणि यामुळे हा अपघात झाला. याला तांत्रिक भाषेत Controlled Flight Into Terrain असे म्हटले जाते.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मेहबूबाला पाठीवर घेऊन चालला होता तरूण अन् पुढे भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ
“वाजपेयींची गाडी मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे वापरली, मोदीजींनी 7 वर्षांत 4 गाड्या बदलल्या”
कोरोना कधी संपणार?; WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं
लहान मुलांच्या लसीकरणासाठी शाळा सज्ज; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार तातडीची बैठक
आरोग्य विभागात खळबळ; ‘या’ हॉस्पिटलमधील 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण