काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर

नवी दिल्ली | देशात व्यसनमुक्तीसाठी सरकारनं अनेक लोक कल्याणकारी कार्यक्रम राबवले आहेत. तंबाखू, दारू, वाईन, गांजा अशा प्रकारची व्यसन नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.

अल्कोहोल आणि तंबाखू आरोग्याठी हानिकारक असल्याचं सर्वांना माहिती असलं तरी व्यसन करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच आता कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थेचा सर्वे खूप काही सांगत आहे.

तंबाखू आणि मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर वर्गवारी करण्यात आली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मद्यपानाचं नाव काढलं की सर्वांच्या समोर पुरूष उभे राहातात पण या सर्वेनं हा अंदाज खोटा ठरवला आहे. पुरूषांच्या तुलनेत महिला या जास्त प्रमाणात मद्यपान आणि तंबाखू सेवन करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

2015 मध्ये 15 वर्षांवरील मुलींचं मद्यपान करण्याचं प्रमाण 2.4 टक्के होतं. 2020-21 मध्ये हे प्रमाण 4.3 टक्क्यांवर गेलं आहे. याउलट पुरूषांचं प्रमाण हे 2015 मध्ये 39.3 टक्के होतं ते घटून 28.8 टक्क्यांवर आलं आहे.

ओडिशा राज्यात हा सर्वे करण्यात आला आहे. ओडिशाच्या ग्रामीण भागातील 15 वर्षांवरील मुलं-मुली हे शहरी भागापेक्षा अधिक प्रमाणात मद्यपान आणि तंबाखू सेवन करत असल्याचं समोर आलं आहे.

मद्यपानासोबतच तंबाखू सेवन करण्यात देखील महिलांचे प्रमाण वाढलं आहे. 2015 -16 दरम्यान केवळ 17.3 इतकं होत सध्या ताज्या सर्वेक्षणानूसार हा आकडा 26 टक्क्यांवर गेला आहे.

तंबाखू खाणाऱ्या पुरूषांचा आकडा 55.9 टक्क्यांवरून 51.6 टक्क्यांवर आला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

दरम्यान, कुटुंब कल्याण सर्वेक्षण विभागाअंतर्गत देशभरात सर्वेक्षण केलं जात आहे. मद्यपान आणि तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सरकारतर्फे प्रभावीपणे राबवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम