CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | देशाच्या सुरक्षा यंत्रणेचा सर्वात मोठा सारथी असणारे देशाचे पहिले तिन्ही दल सुरक्षा प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं काही दिवसांपूर्वी हेलिकाकाॅप्टर अपघातात निधन झालं होतं.

आपल्या अदम्य साहसाच्या जोरावर रावत यांनी भारतीय सैन्यांची कमान यशस्वीपणे आपल्या खांद्यावर सांभाळली होती. पण त्यांचा मृत्यू देशाचं मोठं नुकसान करून गेला.

बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचंदेखील या अपघातात निधन झालं होतं. रावत आपल्या 12 इतर साथिदारांसह प्रवास करत होते.

रावत यांच्या हेलिकाॅप्टर अपघातानं सर्वच देशात खळबळ माजली होती. रावत यांच्या अपघातात परकीय शक्तींचा हात असल्याचं बोललं जात होतं.

भारतीय हवाई दलाच्या एका पथकाची नियुक्ती या अपघाताची तपासणी करण्यासाठी करण्यात आली होती. देशाचे एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील तपासणी पथकानं आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.

प्राथमिक अहवालानूसार, खोऱ्यातील हवामानात अचानक बदल झाला. परिणामी हेलिकाॅप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. अशा परिस्थितीत हेलिकाॅप्टरच्या पायलटला देखील धोक्याचा अंदाज बांधता आला नाही.

पथकानं सर्व बाजूंनी तपास केला आहे. ब्लॅक बाॅक्स, डाटा रिपोर्ट, फ्लाईट रिपोर्ट काॅकपिट व्हाॅईस रेकार्ड या सर्व गोष्टींच्या आधारावर हा तपास करण्यात आला आहे.

बिपीन रावत यांच्या जाण्यानं देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. देशाच्या सीमेवर चीन आणि पाकिस्तान या राष्ट्रांचा वाढता दबाव पहाता रावत यांच्या अनुभवाचा फायदा देशाला होत होता.

चीनच्या वाढत चाललेल्या महत्त्वाकांक्षांना रावत यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर विरोध केला होता. रावत यांच्या जाण्यानं देश एका खऱ्या नायकाला मुकला आहे.

दरम्यान, रावत यांनी आपल्या काराकिर्दीत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये काम केलं आहे. रावत यांनी देशाच्या जवानांमध्ये नवा जोश भरला हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या –

 प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहने सोडली मुंबई; समोर आलं ‘हे’ कारण

 ‘माझं 67 लाख घेतलं…’, पोलीस चौकी गाठत नेता ढसाढसा रडला; पाहा व्हिडीओ

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय