झटपट वजन कमी करायचंय?, डाएट न करता फक्त ‘या’ 5 गोष्टी करा; चमत्कार होईल

मुंबई | धावत्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या विविध समस्या जाणवायला लागल्या आहेत. सर्वाधिक समस्या ही लठ्ठपणाची आहे. आहारातील अनियमितता ही लठ्ठपणासाठी कारणीभूत आहे.

लठ्ठपणा हा आजार बनत चालला आहे. परिणामी अनेक प्रकारचे उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण करताना पहायला मिळतात. जेवणावर नियंत्रण ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे.

4 मार्च हा जागतिक लठ्ठपणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस लाखो लोकांना हा लठ्ठपणाचा त्रास जाणवायला लागला आहे. परिणामी विविध उपाय करण्यावर अनेकजण भर देत आहेत.

लठ्ठपणा हा अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरतो. ह्रद्यविकार, रक्तदाब, किडनीचा आजार अशा अनेक आजारांना लठ्ठपणा कारणीभूत ठरतो. परिणामी वेळीच सावध होेणं गरजेचं आहे.

हलक्या पद्धतीचा नाश्ता करणं हा लठ्ठपणावर एक उत्तम पर्याय आहे. फळे, भाजीपाला, अंडी, प्रोटीनयुक्त पदार्थ इत्यादी पदार्थाचा समावेश आपल्या नाश्त्यात केल्यानं शरीरात फॅट वाढत नाही.

लिक्विड कॅलरीच्या सेवनाचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. अशाप्रकारचे पदार्थ घेतल्यानं लठ्ठपणा वाढतो. फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश जेवणात करावा. फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करावा.

कडधान्ये, गव्हाचा समावेश दररोजच्या जेवणात केल्यानं लठ्ठपणा बऱ्यापैकी कमी होतो. जेवणाच्या अगोदर आणि नंतर पाणी जास्त प्रमाणात पिल्यानं शरीरात चांगल्या प्रकारे हालचाल होते.

दरम्यान, व्यायाम करणे, चालणे, सायकलिंग, इत्यादी प्रकारचे शारिरीक व्यायाम केल्यानं लठ्ठपणा नाहीसा होतो. तळलेले पदार्थ खाण्याला आळा घालणे गरजेचे आहे. विविध प्रकारचे बाहेरचे पदार्थ खाणे टाळले तर लठ्ठपणाची समस्या जाणवत नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू” 

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर

फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना