पॅनकार्ड वापरणाऱ्यांनो काळजी घ्या! ‘या’ एका चुकीसाठी भरावा लागेल 10 हजाराचा दंड

मुंबई | सध्याच्या काळात बॅंकिंग व्यवहार असो की शासकिय योजनांचा लाभ, पॅनकार्ड आणि आधारकार्ड अनिवार्य झाली आहेत.

नागरिकांची डिजिटल ओळख म्हणून आधारकार्ड आणि पॅनकार्डला ओळखलं जातं. परिणामी सर्वांकडं हे दोन्ही ओळखपत्रे असणं गरजेचं आहे.

पॅनकार्ड नागरिकांच्या बॅंकिंग व्यवहारासाठी महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. पॅनकार्ड व्यवहारातील नियमितता तपासण्याच्या कामी येतं.

पॅनकार्ड वापरकर्त्यांना सातत्यानं नवीन नियमावली सरकार आणि आरबीआयकडून लागू करण्यात येते. अशातच आता नवीन माहिती समोर येत आहे.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याच्या तारखेत सातत्यानं वाढ करण्यात आली होती. आता 31 मार्च 2022 ही लिंक करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

1 एप्रिलपासून आधारकार्डशी संलग्न नसलेल्या पॅनकार्डला निष्काशित करण्यात येणार आहे. सोबतच नागरिकांना 10 हजार रूपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272 ब नूसार व्यवहारात अनियमितता आढळली तर आणि पॅनकार्ड आधारकार्डशी संलग्न नसेल तर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आधारकार्ड आणि पॅनकार्ड ही कागदपत्रे सर्वांनी काळजीपूर्वक जपणं गरजेचं आहे. सध्या या कागदपत्रांशिवाय कसलंही काम होत नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रूपये गुंतवून मिळवा तब्बल 14 लाख

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! होळीपूर्वी सरकारने दिलं ‘हे’ खास गिफ्ट

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन

फोटोसाठी पोज देत होती महिला, सेकंदात जे काही झालं ते…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ