मंत्री धनंजय मुंडेंच्या तब्येतीसंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती!

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर माध्यमांना मुंडे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

काल धनंजय मुंडे जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर शरद पवार यांना भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.

आज सकाळी अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन – चार दिवसात त्यांना आराम मिळेल, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी पक्षाचे नेते रुग्णालयात पोहोचत आहे. त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेही रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

ब्रिज कँडी रुग्णालयात असलेल्या धनंजय मुंडे यांची भेट पंकजा मुंडे यांनी नुकतीच घेतली. कट्टर राजकीय शत्रू असलेल्या या बहिण भावांमध्ये यावेळी कौटुंबिक चर्चा झाल्याची माहिती समोर आलीये.

फार दगदग करू नकोस, काळजी घे, असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी यावेळी भाऊ धनंजय मुंडे यांनी दिल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-  

“राज ठाकरेंच्या सभांमुळे करमणूक होते, त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

‘…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं’; शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला 

सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल 

‘काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे’; पंकजा मुंडेंचा भावाला प्रेमाचा सल्ला 

राज्यातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज