मुंबई | कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
जानेवारीच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असा विशेषतज्ञांनी लावलेला अंदाज चुकीचा होता का? मात्र, नवीन अभ्यासानुसार, भारतात 23 जानेवारीला कोरोनाची प्रकरणं शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल यांनी सांगितलं, की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भारतातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपेल. आयआयटी कानपूरच्या सूत्र मॉडलनुसार, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लाट उच्चांक गाठेल.
भारतात कोरोनाचे एका दिवसात नवीन 2,58,089 रुग्ण समोर आल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 3,73,80,253 झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांमधील 8,209 रुग्ण कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी सकाळी आठ वाजता जारी करण्यात आलेल्या अपडेट आकडेवारीनुसार, देशातील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ओमाक्रॉन व्हेरिएंटची 8,209 प्रकरणं आढळून आली आहेत. यातील 3,109 लोक कोरोनामुक्त झाले आहेत किंवा इतर ठिकाणी निघून गेले आहेत.
देशातील मेट्रो सिटीबाबत सूत्र मॉडलचा केलेला अभ्यास बरोबर नाही. कोरोना टेस्टबाबत आलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे टेस्टची संख्या कमी झाली आहे, यामुळे रुग्णसंख्या कमी येत आहे, असं आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल म्हणालेत.
दरम्यान, कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार 89 कोरोना रुग्णांची नोंद झालीय.
ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील आठ हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात 1 लाख 51 हजार 740 जण कोरोनामुक्त झाले असून 385 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…
“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”
IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा