कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णसंख्येत मोठी प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे.

कोरोना तिसऱ्या लाटेत रूग्णसंख्या जरी एकीकडे वाढत असली तरी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रूग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे.

तिसऱ्या लाटेत पहिल्या दोन लाटेपैक्षा मृत संख्या देखील कमी झाल्याचं पहायला मिळतंय. लसीकरणाचा चांगला परिणाम  तिसऱ्या लाटेत दिसून येत आहे.

अशातच मृतांची संख्या कमी असण्यामागील कारण लसीकरण असल्याचं निति आयोगाचे आरोग्य गटाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

लोकांनी दुसरा डोसही घेतला पाहिजे. नाहीतर त्यांच्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईची साखळी कमकूवत होईल आणि परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असते, असंही ते म्हणाले आहेत.

मात्र, ज्या लोकांनी अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही. त्यांना धोका कायम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या 6 राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची टक्केवारी 72 इतकी आहे. तर आता आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा बुस्टर डोस देत असल्याची माहिती देखील आरोग्य खात्याने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

…तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल

  5 वर्षाखालील मुलांनी मास्क लावावं की नाही?; केंद्र सरकारनं जारी केले नवे नियम

  T20 World cupचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने सामने