Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

संभाजीराजेंसाठी शिवसेना मोठी खेळी करण्याची शक्यता!

Ofhgafaf e1646054829885
Photo Credit- Twitter/@YuvrajSambhaji

मुंबई | राज्यासह देशात सध्या विविध विषयांवरून वाद सुरू आहेत. अशात राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानं राजकीय पक्षांसह इच्छूकांची पळापळ चालू आहे.

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. पक्षीय बलाबल पाहाता भाजप दोन आणि महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना प्रत्येकी एक-एक जागा लढवण्याची शक्यता होती.

प्रत्येक वेळी एक राज्यसभेची जागा लढवणारी शिवसेना यावेळी मात्र दोन जागा लढवणार असल्यानं अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असलेले संभाजी छत्रपती यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजी राजे यांच्यांत झालेल्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक संभाजी राजेंनी शिवसेनेकडून लढवावी यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

संभाजी राजेंना शिवसेना आपला उमेदवार म्हणून पुढे आणू पाहात आहे. मराठा मतांचं गणित जुळवण्यासाठी संभाजी राजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा मुद्दा निकाली काढणं महाविकास आघाडीसाठी गरजेच आहे.

उद्धव ठाकरेंसोबत बैठकीनंतर अद्यापी संभाजी राजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण संभाजी राजे शिवसेना उमेदवार होण्यास तयार झाले तर हा भाजपला मोठा धक्का असेल अशी चर्चा आहे.

उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात देखील संभाजी राजेंच्या उमेदवारीवरून महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील इच्छूक उमेदवारांची संख्या देखील मोठी आहे. आता शिवसेना संजय राऊत यांच्यासोबत संभाजी राजेंना राज्यसभेत पाठवते की इतर कोणाला हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली”