पुणे शहरातील वाढता राजकीय गोंधळ; पोलीस आयुक्तांनी उचललं मोठं पाऊल

पुणे | पुणे हे संस्कृती आणि विद्येचं माहेरघर म्हणून राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जोरदार राजकारण पेटलेलं आहे.

काही दिवसांपुर्वी पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या दौऱ्यावेळी बराच गोंधळ झाला होता. त्यावेळी काही जणांवर गुन्हे देखील दाखल झाले.

पुण्यात एका महिला कार्यकर्त्यावर हात उचलल्यानं भाजपवर जोरदार टीका देखील झाली. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंची सभा पुण्यात होणार आहे.

महाविकास आघाडी, भाजप, मनसे, रिपाई यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष उद्भवला आहे. परिणामी शहरातील वातावरण बिघडू नये म्हणून पुणे पोलिसांनी एक पाऊल उचललं आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एका सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन पुण्यात केलं आहे. या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी आमंत्रित आहेत.

पुणे शहराची ओळख शांत शहर म्हणून आहे. पुण्यात कसल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये म्हणून आयुक्त अमिताभ गुप्ता सर्व पक्षांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंची सभा गणेश कला व क्रिडा मैदानात होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर देखील या बैठकीचं महत्त्व सध्या वाढलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

 आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार